रामायणाचा प्रसार-प्रचार आणि त्याविषयीचा अभ्यास वाढीला लागण्याच्या हेतूने आयोजन
श्रीराम म्हणजे प्रजाहितदक्ष असा आदर्श राजा. म्हणूनच उत्तम पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या राज्याला रामराज्य असे म्हणतात. अयोध्येला श्रीराम मंदिराची पुनर्स्थापना झाल्यानंतर नागरिकांमध्ये रामायणाबद्दलचे कुतूहल पुन्हा वाढीला लागले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘वाल्मिकी रामायण’ या विषयावर देश पातळीवरील ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रामायण समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या स्पर्धेत विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामान्य नागरिक, विविध संस्थांचे कार्यकर्ते असे रामायण विषयाचा अभ्यास करू इच्छिणारे सर्व जण भाग घेऊ शकतात.
ही स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क आहे. स्पर्धेत बहुपर्यायी (MCQ) प्रकारचे २० प्रश्न दिले जातील. त्यातील योग्य पर्याय निवडून उत्तर द्यायचे आहे. ही १५ मिनिटांची ऑनलाइन परीक्षा असेल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरून नोंदणी अर्ज भरावा. https://onlineexam.sanskrutisamvardhan.org
नोंदणी करताना मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती यांपैकी इच्छित भाषा निवडावी. यशस्वीरीत्या नोंदणी झाल्यानंतर १९ एप्रिल ते तीन मे या कालावधीतील आपल्याला सोयीचा दिवस निवडावा. नोंदणीची पोच एसएमएस, ई-मेलद्वारे मिळेल. आपण निवडलेल्या दिवशी पुन्हा त्याच लिंकवर क्लिक करून परीक्षा देता येईल.
नोंदणी झाल्यानंतर स्पर्धकांना त्यांच्या निवडलेल्या भाषेत वाल्मिकी रामायण विषयावरील १००० प्रश्नोत्तरांचा संच पाठवण्यात येईल. त्यासोबत स्वतःही अभ्यास करता येईल. परीक्षा पूर्ण होताच तत्काळ निकाल दिसेल. गुणांनुसार प्रमाणपत्रही मिळेल. सर्व यशस्वी स्पर्धकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपल्या ओळखीतील जास्तीत जास्त जणांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment