वर्षातून दोनदाच दरवाजे उघडणारे सोलापूरमधील हनुमान मंदिर - अमृत महाराष्ट्र

वर्षातून दोनदाच दरवाजे उघडणारे सोलापूरमधील हनुमान मंदिर

नरसिंग गिरजी मिलमध्ये आहे मारुतीचे २०० वर्षे पुरातन देऊळ

वर्षातून दोनदाच दरवाजे उघडणारे सोलापूरमधील हनुमान मंदिर मुख्य फोटो
वर्षातून दोनदाच दरवाजे उघडणारे सोलापूरमधील हनुमान मंदिर अतिरिक्त फोटो

सोलापूर शहराच्या औद्योगिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक नरसिंग गिरजी मिलमधील हनुमान मंदिरात यंदाही हनुमान जयंतीला भाविकांनी मोठी गर्दी करून दर्शन घेतले. हे मंदिर वर्षातून फक्त दोन वेळाच भाविकांसाठी खुले केले जाते. मकर संक्रांत आणि हनुमान जयंती या दोनच दिवशी हे मंदिर सार्वजनिक दर्शनासाठी उघडले जाते.

​हे मंदिर साधारणपणे २०० वर्षे जुने असून सोलापूरच्या समृद्ध वारशाचा एक भाग आहे. या मंदिरातील मारुतीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. हा मारुती अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. २००१मध्ये नरसिंग गिरजी मिल बंद झाल्यानंतर ही संपूर्ण जागा शासकीय अखत्यारीत आली. सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर वर्षभर बंद असते. परंतु परंपरेनुसार वर्षातील दोन महत्त्वाच्या दिवशी प्रशासनातर्फे मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते.

मकर संक्रांतीप्रमाणेच हनुमान जयंतीलाही भाविकांनी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत या मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी अथर्वशीर्ष, मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा आदी स्तोत्रांचे पठण करण्यात आले. संध्याकाळी सुंदरकांडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ऐतिहासिक चिमणीच्या सावलीत असलेल्या या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोलापूरकरांसह बाहेरील भाविकांनीही मोठ्या संख्येने येथे हजेरी लावली होती.


Publisher: Shreyas Kulkarni,Birudev Waghmode, Arya kulkarni News publisher name | Date: 07-04-2026 News publication date | Time: 11:29 AM News publication time | Views: 315 Number of times this news has been viewed | District: solapur Related district of the news
Publisher: Shreyas Kulkarni,Birudev Waghmode, Arya kulkarni News publisher name | Date: 07-04-2026 News publication date | Time: 11:29 AM News publication time | Views: 315 Number of times this news has been viewed | District: solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement