कौशल्य प्रशिक्षणासह विविध प्रकारच्या योजनांची माहिती मिळाल्याने नागरिकांकडून कौतुक
नाशिक : मराठी भाषा गौरव दिनापासून म्हणजेच २७ फेब्रुवारीपासून नाशिकमध्ये भरलेल्या विश्व मराठी संमेलनाची एक मार्च २०२६ रोजी सांगता झाली. यामध्ये वेगवेगळ्या प्रकाशन संस्था तर सहभागी झाल्या होत्याच; पण विविध शासकीय संस्था आणि विभागांच्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने या संस्थांची दालनेही संमेलनात होती. त्यामध्ये महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे दालन विशेष उल्लेखनीय होते. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांकरिता या संस्थेतर्फे वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आणि योजना राबवल्या जातात. या योजनांची माहिती या संमेलनात आलेल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता अमृत संस्थेने प्रभावीपणे काम केले.
अमृत संस्थेच्या दालनाला मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सहसचिव डॉ. नामदेव भोसले, उपसंचालिका अंजली ढमाळ, माहिती अधिकारी विलास बोडके, महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, सचिन अनगळ, प्रसिद्ध सुलेखनकार सुनील धोपावकर, आरवायके कॉलेजचे डॉ. विजय अवस्थी, प्रसिद्ध यू-ट्यूबर प्रसाद जोशी आदी मान्यवरांनी भेट दिली. संदीप फाउंडेशन, केटीएचएम कॉलेज, गुरू गोविंदसिंग कॉलेज, केबीटी कॉलेज, सपकाळ कॉलेज, नाशिक जिल्ह्यातील सर्व आयटीआय कॉलेजेस आणि आणखीही अनेक कॉलेजेसमधील विद्यार्थी व मराठी भाषाप्रेमींनी संमेलनाला आणि अमृत संस्थेच्या दालनात हजेरी लावली. डॉ. तेजस गर्गे, सुनील धोपावकर, प्रसाद जोशी, किरण कुलकर्णी यांनी अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक व अभिनंदन केले. या वेळी अमृत संस्थेचे विभागीय अधिकारी मंगेश खाडिलकर, अमृत सल्लागार समिती सदस्य गौरव बडवे, जिल्हा व्यवस्थापक संजय गोसावी, अमृतमित्र मयूर हातवळणे यांनी आलेल्या दालनाला भेट देणाऱ्यांना अमृत संस्थेची माहिती दिली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
ssad
asdsa
Write a Comment