गडचिरोलीतील तुळजाबाई प्राथमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा
गडचिरोली : मराठी भाषा गौरव दिवस गडचिरोलीतील आरमोरी रस्त्यावरील तुळजाबाई प्राथमिक शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागातून साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुंदा टिकले, शाळा कर्मचारी निकिता भुरले, पद्मश्री नरुले, अमृत या स्वायत्त संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक गौरव दुपल्लीवार, अमृतसखी सौ. माधुरी रोटकर या वेळी उपस्थित होते.
मराठी भाषेच्या गौरवशाली इतिहासाला या वेळी उजाळा देण्यात आला. मराठी ही फक्त भाषा नाही, तर महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि अस्मिता यांचा वारसा आणि गौरव आहे. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, तुकारामांचे अभंग, लोकमान्य टिळकांचे लेखन, पु. ल. देशपांडे यांचे साहित्य ही मराठी भाषेची संपदा आहे. मराठी भाषेच्या माध्यमातून महाराष्ट्राने समाजपरिवर्तन करण्याचे कामही केले आहे. मराठी भाषा विचार करायला शिकवते. म्हणून मराठीचा अभिमान बाळगणे, तिचा अभिमानाने वापर करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, अशी भावना या वेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment