यवतमाळमधील सेवा समर्पण प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या दिव्यांग सेवा समितीचा कौशल्यविकासासाठी उपक्रम
यवतमाळ : येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या दिव्यांग सेवा समितीमार्फत दिव्यांग (अंध) मुलांमध्ये कौशल्यतंत्र विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. समाजातील दिव्यांग बांधव स्वावलंबी व आत्मनिर्भर बनावेत, या उदात्त हेतूने लघुउद्योग प्रशिक्षण व उत्पादन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
या केंद्रामध्ये दिव्यांग मुलांना विविध लघुउद्योगांचे प्रशिक्षण देण्यात येत असून, सध्या नैसर्गिक रंगांच्या (Natural Colors - प्राकृतिक रंग) निर्मितीचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक, आरोग्यदायी आणि रसायनमुक्त रंगांची निर्मिती करून दिव्यांग मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून मिळणारे उत्पन्न दिव्यांग बांधवांचे स्वावलंबन आणि पुनर्वसनासाठी वापरले जाते.
या उपक्रमामुळे दिव्यांग मुलांमध्ये आत्मविश्वास वाढत असून, त्यांच्या कौशल्याला व्यावसायिक दिशा मिळत आहे. तसेच समाजात पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेशही दिला जात आहे. उत्पादन प्रशिक्षणाबरोबरच विक्री प्रक्रियेचेही मार्गदर्शन देऊन त्यांना संपूर्ण उद्योग साखळीची माहिती दिली जात आहे.
या उपक्रमाला सहकार्य करावे आणि दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनाच्या प्रवासात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योगपती व नागरिकांना केले आहे.
संपर्क :
मानवसेवा धाम, भोसावाकी रोड, पारवा, यवतमाळ – ४४५००१
संपर्क क्रमांक : ९४२२१६६६५८
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment