गोंदियातील युवकाची प्रेरक कथा
गोंदिया : स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच गोंदिया तालुक्यातील गुदमा आवरीटोला येथील युवक ओंकार हरीणखेडे यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. नोकरीची वाट पाहण्याऐवजी त्यांनी बेकरी व्यवसाय सुरू केला. आज स्वतःच्या मेहनतीवर हजारोंची कमाई करून ते आत्मनिर्भर झाले आहेत.
सुरुवातीला साधनसामग्री आणि भांडवल मर्यादित असतानाही ओंकार यांनी जिद्द आणि सातत्याच्या जोरावर व्यवसाय उभा केला. त्यांच्या बेकरीतील ताज्या आणि दर्जेदार पदार्थांमुळे परिसरातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ओंकार म्हणतात, की “स्वतःवर विश्वास ठेवला आणि मेहनत केली तर यश नक्की मिळते. नोकरीसोबतच व्यवसायही एक उत्तम पर्याय आहे.”
आज ओंकार इतर तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. त्यांच्या यशकथेने अनेक युवकांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment