माजलगावमध्ये १८ फेब्रुवारीपासून गुरुवर्य चैतन्यमहाराज देगलूरकरांची प्रवचनमाला

विषय : श्री ज्ञानेश्वर माउलींचा हरिपाठ

माजलगावमध्ये १८ फेब्रुवारीपासून गुरुवर्य चैतन्यमहाराज देगलूरकरांची प्रवचनमाला मुख्य फोटो
मुख्य फोटो

माजलगाव (जि. बीड) : गुरुवर्य ह. भ. प. चैतन्यमहाराज देगलूरकर (पंढरपूर) यांच्या मधुर व रसाळ वाणीचा अनुभव माजलगाववासीयांना घेता येणार आहे. माजलगाव येथील श्री संत धुंडामहाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान आणि राजस्थानी सेवा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांच्या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी याचा प्रारंभ होणार असून, भाविकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रवचनमालेचे यंदा सलग १६वे वर्ष असून, या वर्षी प्रवचनमालेचा विषय 'श्री ज्ञानेश्वर माउलींचा हरिपाठ' असा आहे. हरिपाठाचे आध्यात्मिक महत्त्व, भक्तिमार्गातील स्थान आणि जीवनातील सकारात्मक परिवर्तन यावर महाराज आपल्या अमृतवाणीतून रसाळ विवेचन करणार आहेत. या प्रवचनमालेसाठी माजलगाव व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री संत धुंडामहाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान व राजस्थानी सेवा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

कालावधी : १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२६

वेळ : दररोज सायंकाळी ६.३० ते ८.३० वा.

स्थळ : राजस्थानी मंगल कार्यालय, माजलगाव, जि. बीड

Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 17-02-2026 News publication date | Time: 12:01 PM News publication time | Views: 69 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 17-02-2026 News publication date | Time: 12:01 PM News publication time | Views: 69 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words