जगोनी गीता मर्म । सांभाळलासे महाराष्ट्रधर्म ।
ठेवोनी निरपेक्क्ष कर्म । मनाचिया अंतरी ॥
आदर्श शिवरायाचे । गुण गीतासाराचे ।
श्रद्धाश्रेय राष्ट्रधर्माचे । मनाचिया अंतरी ॥
या संकल्पांचे निमित्ते । भाव लावा चित्ते ।
धरूनिया देशहिते । मनाचिया अंतरी ॥
जनहिते राष्ट्र केवळ । कल्याणे करोनी सकळ
मिटे अज्ञानचा मळ । मनाचिया अंतरी ॥
ह्या संस्कारांचे रोप । होती चारित्र्याचे द्वीप ।
घेता शिक्षणाचे दीप । मनाचिया अंतरी ॥
या परी हे आचरण । सत्-कर्माचे कारण ।
कर्म-भक्तीचे पाचारण । मनाचिया अंतरी ॥